Skip to main content
Back to News & Schemes

पशुपालकांनों!! जनावरांसाठी चाटण विटा घेताय खरं पण या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का??

Krishi Jagran Marathi2 min read

शेतकरी बंधुनो, चाटण विटा (Mineral Lick Blocks) जनावरांच्या पोषणासाठी महत्वाच्या असतात. पण चुकीची विट खरेदी केली तर आरोग्याचा आणि पैशाचा…

शेतकरी बंधुनो, चाटण विटा (Mineral Lick Blocks) जनावरांच्या पोषणासाठी महत्वाच्या असतात. पण चुकीची विट खरेदी केली तर आरोग्याचा आणि पैशाचा दोन्ही तोटा होऊ शकतो. म्हणूनच खरेदी करताना हे लक्षात ठेवा:

- ब्रँड व कंपनीचा दर्जा पाहा – ISO, BIS प्रमाणित उत्पादकांची निवड करा.

- साहित्य तपासा – कॅल्शियम, फॉस्फरस, मिठ, झिंक, कॉपर, सेलेनियम यांचे प्रमाण योग्य आहे का ते पहा.

- जनावरांच्या वयोगटानुसार निवड – वासरं, दुधाळ जनावरे, गाभण जनावरे यांच्यासाठी वेगवेगळ्या विटा उपलब्ध आहेत.

- आकर्षक रंगांवर न जाऊन गुणवत्ता पहा – काही विटा रासायनिक रंगांनी रंगवल्या जातात.

- सेंद्रीय (Organic) की रासायनिक? – शक्यतो सेंद्रिय पर्याय निवडा.

- पॅकिंग व लेबलिंग तपासा – उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट आणि साहित्याची यादी पहा.

- किंमत आणि वजनाचा तुलनात्मक विचार करा – जास्त वजन आणि योग्य किंमत असलेली विट घेणे फायद्याचं.

- पशुवैद्यकांचा सल्ला घ्या – जनावरांच्या स्थितीनुसार कोणती विट योग्य आहे हे जाणून घ्या.

- स्थानिक हवामान विचारात घ्या – काही ठिकाणी विशिष्ट खनिजांची कमतरता जास्त असते.

- ओलसरपणा टाळा – विटा कोरड्या ठिकाणी ठेवलेल्या असतील याची खात्री करा.

- जनावरांची आवड तपासा – काही जनावरे विशिष्ट प्रकारच्या चव असलेल्या विटा जास्त चाटतात.

- डुप्लिकेट प्रोडक्टपासून सावध रहा – फसवे ब्रँड्स टाळा आणि नेहमी अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करा.

“योग्य चाटण विट = निरोगी जनावरे + जास्त दूध उत्पादन”

लेखक- नितीन रा. पिसाळ

पशुसंवर्धन सल्लागार व कृषी अभ्यासक

फार्मर द जर्नलिस्ट- कृषी जागरण (राष्ट्रीय कृषी मीडिया)

This story was reported by Krishi Jagran Marathi.

Read the original article